BJP Office Land Row: 'फाईलचा प्रवास राफेलच्या वेगाने', Sanjay Raut यांचा थेट Amit Shah यांना सवाल
Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते मुंबईतील चर्चगेट (Churchgate) येथील भाजपच्या (BJP) नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन संपन्न झाले. मात्र या कार्यक्रमापूर्वीच विरोधकांनी भूखंडावरून आरोपांच्या फैरी झाडल्या. 'या भूखंडाच्या फायलीचा प्रवास राफेलच्या वेगानं झाला,' अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली असून त्यांनी याप्रकरणी अमित शहा यांना पत्रही लिहिले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची (Maharashtra Housing Finance Corporation) भाडेतत्त्वावरील जागा, धोकादायक इमारत दाखवून ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement