माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले. काल दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते.