Suresh Dhas Beed : मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांची सुरेश धसांनी घेतली भेट, दोषींवर कडक कारवाईची मागणी

Continues below advertisement
बीड (Beed) जिल्ह्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामुळे (Doctor Suicide Case) खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. 'यातील सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी', असे म्हणत धस यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. मृत डॉक्टरने यापूर्वी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही, त्यामुळे या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, साताऱ्यातील पोलिसांनी (Satara Police) पीडित कुटुंबाचा जबाब घेण्यासाठी बीडमध्ये यावे, त्यांना साताऱ्याला बोलवू नये, अशी मागणीही आमदार धस यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola