Shivajirao Kardile : भाजपचे ज्येष्ठ नेते, शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Continues below advertisement
भारतीय जनता पक्षाचे (BJP) जेष्ठ नेते आणि राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे निधन झाले आहे, त्यामुळे अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बुऱ्हानगर गावचे सरपंच म्हणून केली होती आणि पुढे आमदार व मंत्री पदांपर्यंत मजल मारली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अहिल्यानगर शहरातील विद्यमान आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचे सासरे होते. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement