Aapla Dawakhana Row: 'आरोग्य योजनेचा बोजवारा, 40 दवाखाने बंद', भाजप आमदार Sanjay Kelkar आक्रमक
Continues below advertisement
ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झालेल्या 'आपला दवाखाना' योजनेवरून भाजप आक्रमक झाले आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी ही योजना ठाण्यात पूर्णपणे फसल्याचा आरोप केला आहे. 'महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा फार बोजवारा उडालेला आहे, वाजतगाजत चाळीस ठिकाणी सुरू झालेले आपला दवाखाने पूर्ण बंद पडले,' असा थेट आरोप केळकर यांनी केला. या योजनेअंतर्गत असलेले दवाखाने बंद करून त्या जागी इतर व्यवसाय सुरू करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. संबंधित कंपनीवर ५६ लाख रुपयांचा दंड ठोठावून तो वसूल करावा आणि कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केळकर यांनी केली आहे. अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement