Anti-Conversion Law: 'लवकरच धर्मांतरबंदी कायदा आणणार', Nitesh Rane यांची मोठी घोषणा

Continues below advertisement
राज्यात लवकरच धर्मांतरबंदी कायदा आणणार असल्याची मोठी घोषणा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. 'आमच्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा जेव्हा लागू होईल, तेव्हा हे सर्व मनसुबे आणि षडयंत्र बंद होऊन जातील,' असे ठाम मत राणे यांनी व्यक्त केले. विविध घटनांचा संदर्भ देत, राज्यात अशा कायद्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच सांगितले आहे की, येत्या हिवाळी अधिवेशनात धर्मांतरबंदी कायद्याचे विधेयक मांडले जाईल. महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनीही या कायद्याला दुजोरा दिला असून, आदिवासी भागातील बेकायदेशीर चर्चवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. हा कायदा लागू झाल्यास, महाराष्ट्र असे कायदे करणारे देशातील ११ वे राज्य ठरेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola