BJP Mega Plan : भाजपच्या चार बड्या नेत्यांवर प्रचाराची मोठी जबाबदारी
BJP Mega Plan : भाजपच्या चार बड्या नेत्यांवर प्रचाराची मोठी जबाबदारी
चूक भूल करू नका, बापासोबत राहा.... बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या कन्येला दिला आहे. वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका, असे देखील अजित पवार म्हणाले.ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहेरी येथील जनसन्मान यात्रेत बोलत होते.
अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून सध्या घर फोडण्याचे काम सुरू आहे. मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं. ज्या बापाने जन्म दिला तीच मुलगी आता बापाविरोधात गेली आहे. मला त्यांना एकच सांगायचे आहे की, ज्यावेळी वस्ताद शिकवतो त्यावेळी तो सगळं शिकवत नाही. तो कायम एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूक भूल करू नका, बापासोबत राहा...बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते. असे असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही, त्यासंदर्भात आम्ही देखील अनुभव घेतलेला आहे. मी त्यातून माझी चूक मान्य केली. मात्र आता माझे सांगणे आहे की, वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका.