BJP Meeting : देवेंद्र फडणवीसांच्या, सरकारमधून मुक्त करा या मागणीवर आज फैसला होण्याची शक्यता

Continues below advertisement

नवी दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. ज्या राज्यात येत्या काळात विधान सभा निवडणुका आहेत त्या राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मधून बाहेर पडण्याच्या निर्णयाबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत होणार नाहीये...  महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण या बैठकीत केलं जाणार आहे तसंच  विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे... 

भाजपच्या महाबैठकीसाठी कोण कोण उपस्थित राहणार - 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे
मुंंबई अध्यक्ष आशिष शेलार
माजी खासदार रावसाहेब दानवे
माजी खासदार हंसराज अहिर
माजी मंत्री आणि महासचिव विनोद तावडे
खासदार आणि मंत्री पियुष गोयल
मंत्री चंद्रकांत पाटील

नवनियुक्त महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या समवेत बैठक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram