BJP Meeting Delhi : मित्रपंक्षांसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याच्या फडणवीसांना सूचना

Continues below advertisement

BJP Meeting Delhi : मित्रपंक्षांसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याच्या फडणवीसांना सूचना देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समोर आलेय. राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता, ही जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंत्रीपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला होता. यावर आज चर्चा होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत बैठकीत कोणताही चर्चा झाली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच उपमुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचं आता निश्चित झालेय.   विधानसभा निवडणुकीसाठी रोडमॅप आणि विधानसभेसाठी जागा वाटपाची चर्चा लवकर करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. नवी दिल्लीमध्ये आज महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पिछेहाटीबाबत आणि आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवात साधला.  विधानसभेसाठी केंद्राकडून फूल सपोर्ट मिळणार असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram