Sugar Factory : साखर कारखान्यांबाबत शासन निर्णय अखेर मागे, भाजप नेत्यांना मोठा दिलासा
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच धक्का दिला आहे. कारण साखर कारखान्यांबद्दल काढलेला शासन निर्णय आठच दिवसांत मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. शिंदे आणि फ़डणवीस यांच्या भेटीनंतर हा शासन निर्णय मागे घेण्यात आला. यामुळे भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगमने मंजूर केलेले साडे पाचशे कोटींचं कर्ज हवे असल्यास अनेक नव्या अटींचीस पूर्तता करावी लागणार होती. याचा फटका भाजप नेत्यांच्या कारखान्यांना बसणार होता. अखेर
भाजप नेत्यांच्या शिष्ट मंडळाने रेल्वे मंत्री राव साहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. त्यानंतर हा निर्णय मागे घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
Continues below advertisement