Udayanraje Bhosale PC | शिवरायांचा अपमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता : उदयनराजे
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही," अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते उदयनराजे यांनी दिली. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली. कुठल्याही प्रकारे महाराजांचा अपमान झाला ही. याच्याएवढी हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही, असंही उदयनराजे म्हणाले.
शपथविधीच्या वेळी शरद पवार तिथे उपस्थित होते. तेव्हा त्यांना विचारा. कृपा करुन जे घडलं नाही ते भासवण्याचा प्रयत्न करु नका, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे.
Tags :
Udayanraje Bhosale Oath Issue Udayanraje Bhosale PC Jai Bhavani Jai Shivaji Udayanraje Bhosale Bjp Leader Rajya Sabha Shiv Sena Ncp