Sanjay Rathod Resignation | संजय राठोडांवर अद्याप गुन्हा का नोंद केला नाही? : भाजप नेत्या चित्रा वाघ

मुंबई: संजय राठोड यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. एफआयआर, ऑडियो क्लिप आणि इतर सारे पुरावे असूनही त्यांना अटक का केली नाही असाही सवाल त्यांनी केलाय.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राऊत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास दीड तासांची चर्चा झाल्यानंतर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला.

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, "राज्याने या प्रकरणाकडे केवळ पूजा चव्हाण आणि संजय राठोड असं बघू नये. हा प्रश्न राज्यातील सर्व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, समाजाला ढाल करुन कशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. हे असंच सुरु राहीलं तर राज्यातील कोणत्याही मुलीला न्याय मिळणार नाही."

आयुष्याचे स्वप्न बघायच्या वयात, अवघ्या 22 वर्षाच्या मुलीच्या जीवनाची संजय राठोड या नराधमाने माती केली असा आरोप करत चित्रा वाघ म्हणाल्या की, "नुसता राजीनाम्याने हा प्रश्न सुटणार नाही. संजय राठोडवर गुन्हा दाखल करावा."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola