Chandrakant Patil | राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत जायला तयार : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला. मात्र राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू अशा पद्धतीचा निर्धार देखील चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला
Continues below advertisement