BJP HQ Row: 'फाईल राफेलच्या वेगाने हलली', Sanjay Raut यांचा घणाघात; जमिनीखाली दडलंय मोठं रहस्य?
Continues below advertisement
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुंबईतील भाजपच्या (BJP) नवीन पक्ष मुख्यालयाच्या भूखंडावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 'भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हलली, ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे,' असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते या कार्यालयाचे भूमिपूजन पार पडले. या भूखंडाला मंजुरी देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा राऊत आणि पवार यांनी केला आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'ज्यांना जागा बळकावण्याची सवय आहे, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत. भाजप काचेच्या घरात राहत नाही,' असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि पक्षाच्या पैशाने ही जागा खरेदी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement