ओबीसी आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका नकारात्मक: Gopichand Padalkar
ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारची भूमिका नकारात्मक असल्याची टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. हा अध्यादेश राज्य सरकारने राज्यपाल यांच्याकडे सहीसाठी पाठवला आहे. मात्र त्यावर राज्यपलांनी शंका उपस्थित केल्याने त्यात दुरुस्ती करुन आजच पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.