Pankaja Munde Facebook Post | पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमध्ये कमळाचा उल्लेख | ABP Majha
पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर ट्विटरवर भाजपच्या अनुल्लेखामुळे पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चांना ऊत आला होता. पण आज पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन करणारी पोस्ट टाकली. त्यात त्यांनी भाजपचं कमळ आवर्जून लावलेलं दिसतंय. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या पक्षांतरांच्या चर्चांना आता स्वत: पंकजांनीच ब्रेक लावलाय.