BJP vs Shivsena : भाजप शिवसेनेचे 5 उमेदवार बदलणार? एकनाथ शिंदे यांना काय दिला सल्ला? Special Report

Continues below advertisement

BJP vs Shivsena : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सध्या जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे. भाजपने 32 जागांवर लढण्याची भूमिका घेऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कोंडीत पकडले आहे. अशातच आता भाजपने शिंदे गटाचे टेन्शन वाढवणारी आणखी एक कृती केली आहे. भाजपकडून शिंदे गटाला (Shinde Camp) त्यांच्या वाट्याला येणाऱ्या लोकसभेच्या 5 जागांवरील उमेदवार बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपच्या (BJP) अंतर्गत सर्वेक्षणात शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या पाच जागांवर यंदा त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही सुचविलेले उमेदवार या जागांवर उभे करा, असा अप्रत्यक्ष आदेशच भाजपश्रेष्ठींनी शिंदे गटाला दिला आहे. भाजपच्या या कृतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाखुश आहेत. भाजपने सुचविलेले उमेदवार एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मान्य नसल्याची माहिती आहे. या पाचही जागांवर आमच्याच पक्षाचे उमेदवार उभे राहतील, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता हा तिढा कसा सुटणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram