Chandrakant Patil : ...काय माहीत, रात्री कुणाला अटक झाली तर!, चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सहज केलेल्या एका सूचक वक्तव्यानं राजकीय क्षेत्राच्या भूवया उंचावल्या आहेत. काय माहीत रात्रीतून कुणाला अटक झाली तर.... असं वक्तव्य नाशिक दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी काल पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केलं. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पण सध्या सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी दिलेला हा सूचक इशारा तर नाही ना.... अशी चर्चाही मग रंगली.....