Maharashtra Cabinet Expansion : नितेश राणे, बावनकुळे ते आशिष शेलार कुणा-कुणाला मंत्रिमंडळात स्थान?
BJP Candidate Oath Ceremony Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमधील (Nagpur) राजभवन येथे संपन्न होत असून महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. मी ... ईश्वर साक्ष शपथ घेतो की, असे म्हणत महायुतीमधील तिन्ही पक्षांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत.