Maharashtra BJP : भाजप अॅक्शन मोडमध्ये, जिल्हा निवडणूक प्रभारींची यादी जाहीर
Continues below advertisement
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली असून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यानुसार एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्याची (Thane) जबाबदारी गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याकडे देण्यात आली आहे, तर बीड (Beed) जिल्ह्यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर बीडचे निवडणूक प्रमुख म्हणून सुरेश धस काम पाहतील. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याची जबाबदारी नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ठाण्यासह कल्याण, मीरा भाईंदर आणि नवी मुंबई या भागांचेही निवडणूक प्रभारी म्हणून गणेश नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याचा उल्लेखही यामध्ये आहे. या नियुक्त्यांमुळे भाजपने निवडणुकीच्या तयारीला वेग दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement