Ajit Pawar : पालकमंत्री अजित पवार निधी देत नसल्याची धूसफूस, भाजप आणि शिंदे गटात नाराजी

Continues below advertisement

Ajit Pawar : पालकमंत्री अजित पवार निधी देत नसल्याची धूसफूस, भाजप आणि शिंदे गटात नाराजी ..
अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केलाय. भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केलीय  अजित पवारांच्या आधी चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी मंजूर केलेल्या विकास कामांचा निधी अजित पवारांनी अडवून धरल्याचा या सदस्यांनी आरोप केलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी तब्बल 800 कोटी रुपयांचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केलाय.  हा 800 कोटी रुपयांचा निधी तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा न्यायालयात जाऊ असा इशारा भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी दिलाय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram