Local Body Election 2025 : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी भाजप-RSS ची मोर्चेबांधणी
Continues below advertisement
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 'विधानसभा निवडणुकीत, संघ आणि त्याच्या ३५ संघटनांनी एकत्र आणि सक्रियपणे काम केल्यामुळे यश मिळाले,' असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. या निवडणुकांमध्ये २८८ नगराध्यक्ष आणि ६,८५९ सदस्य निवडले जाणार असून, २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या सर्व संघटनांसोबत मिळून काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील चुका टाळून आणि विधानसभा निवडणुकीतील विजयाचा कित्ता गिरवत, स्थानिक पातळीवरही यश मिळवण्यासाठी संघ आणि भाजपमध्ये समन्वय बैठका सुरू झाल्या आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement