
Navneet Rana : बच्चू कडू यांच्यापाठोपाठ भाजपही नवनीत राणा यांच्या विरोधात मैदानात
Continues below advertisement
Navneet Rana : बच्चू कडू यांच्यापाठोपाठ भाजपही नवनीत राणा यांच्या विरोधात मैदानात नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांच्यानंतर आता भाजप ही मैदानात उतरली आहे. अमरावतीमधील स्थानिक भाजप नेत्यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने कोणत्याही परिस्थितीत नवनीत राणांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अमरावतीच्या भाजप नेत्यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे केली. राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी प्रक्रिया सुरु होण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काल रात्री नागपुरात फडणवीसांची भेट घेऊन ही मागणी केली.
Continues below advertisement