War of Words: 'वडिलांकडून सुसंस्कृतपणा शिका, बौद्धिक क्लास लावा', Praniti Shinde यांना BJP चं प्रत्युत्तर
Continues below advertisement
सोलापूरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि भाजप (BJP) कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. 'ज्यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवली, असे सुसंस्कृत असणारे आपले पिताश्री यांच्याकडून आपण थोडासा सुसंस्कृतपणा शिकावा,' असा खोचक सल्ला भाजपने प्रणिती शिंदे यांना दिला आहे. युवक काँग्रेसने भाजप कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर, भाजपने 'गेट वेल सून' (Get Well Soon) म्हणत प्रत्युत्तर दिले. प्रणिती शिंदे यांनी 'सरकारनं अतिवृष्टी केली' अशी टीका केली होती, ज्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोलापूर-मुंबई विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमात टीका केली होती. याच टीकेवरून भाजपने प्रणिती शिंदे यांना ठाण्यातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये (Ramabhau Mhalgi Prabodhini) बौद्धिक क्लास लावण्याचा सल्ला दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement