Bitcoin : 300 कोटींचे बिटकॉईन हडपण्यासाठी पोलीस शिपायानंच एकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी बिटकॉईन आणि अन्य क्रिप्टोकरन्सीवर ३० टक्के कर लावण्याची घोषणा केली.... मात्र हा क्रिप्टोकरन्सीचा मोह कुणाला कोणत्या पातळीवर घेऊन जाईल याचा नेम नाही....पिंपरी चिंचवडमध्ये याचाच प्रयत्य आला... ३०० कोटींचे बिटकॉईन हडपण्यासाठी पोलीस शिपायानंच एकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडलीय..यात पोलिसानं गुन्हेगाराचीच मदत घेतल्याचं निष्पन्न झालंय..
पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात पोलीस शिपाई दिलीप खंदारेसह ८ आरोपींना गजाआड केलंय.. विनय नाईक नावाच्या व्यक्तीकडे ३०० कोटींची बिटकॉइन ही क्रिप्टो करन्सी आहे अशी माहिती खंदारेला एका सायबर गुन्ह्याचा तपास करताना मिळाली होती. यातून आपण मालामाल होऊ अशा विचारातून खंदारेनं विनय नाईकच्या अपहरणाचा डाव रचला. खंदारेनं प्रदीप काटे नावाच्या व्यक्तीच्या मदतीनं ताथवडे गावातल्या एका हॉटेलमधून विनय नाईकचं अपहरण केलं..पोलिसांनी अत्यंत शिताफीनं तपास करत या प्रकरणात ८ आरोपींना गजाआड केलंय..