Salman Khan Bishnoi Gang : फक्त सलमान नाही, इतर कलाकारदेखील बिष्णोई गँगच्या रडारवर?
Continues below advertisement
अभिनेता सलमान खानच्या घरासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी मोहम्मद रफिक चौधरी याच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर आलंय. बिष्णोई टोळीच्या रडारवर फक्त सलमान खानच नव्हे तर इतरही बाॅलीवूडचे कलाकारही होते. मोहम्मद रफीक यांच्या मोबाईलमधून सलमान खानच्या घरासोबतच इतरही कलाकारांच्या घराचे व्हिडिओही सापडले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या कलाकारांची नावे मुंबई पोलिसांनी जाहिर केलेली नाहीत. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याच्या दोन दिवस आधी आरोपी रफिक चौधरीने अभिनेता सलमान खानच्या घराची रेकी केली होती.
Continues below advertisement