Bird Flu | राज्यातील सर्वात मोठं किलींग ऑपरेशन नंदुरबारमध्ये
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मधील 4 पोल्ट्री फॉर्म मधील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाल्याचे समोर आल्या नंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने किलिंग ऑपरेशन सुरू झाले असून आज दिवस भरात नवापूर येथील डायमंड पोल्ट्री मधील 33हजार पक्ष्यांना नष्ट करण्यात आले आहे यासाठी पशू संवर्धन विभागाचे दोनशे कर्मचारी सहभागी होणार आहेत.उद्या या मोहिमेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची वाढणार आहे उद्या ,600 कर्मचारी सहभागी होणार आसल्याने पक्षी नष्ट करण्याचा आकडा 1 लाखाचा घरात राहणार आहे. या चारही पोल्ट्री मधील पक्ष्यांना नष्ट केले जाणार आहे त्यानंतर लाखो अंडे नष्ट केले जाणार आहेत . अति संसर्गजन्य शेत्रातील 5 लाख कोंबड्या आगोदर नष्ट केल्या जातील त्या नंतर इतर कोंबड्या नष्ट केल्या जातील.