Bird Flu in Maharashtra | महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत बर्ड फ्लूचा संसर्ग
Continues below advertisement
कोरोनाचं संकट देशातून काढता पाय घेत नाही, तोच देशात आता बर्ड फ्लूचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अवघ्या 4 राज्यांमध्ये परसलेला हा संसर्ग आता 10 राज्यांमध्ये पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एवियन इन्फ्लुएंजा अर्थात बर्ड फ्लूचा फैलाव दिल्ली आणि महाराष्ट्रातही झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. ज्यानंतर उत्तराखंडमध्येही याचा फैलाव झाल्याची बाब निदर्शनास आली. सध्याच्या घडीला हे संकट थोपवून लावण्यासाठी केंद्र आणि स्थानिक प्रशासनाकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. दरम्यान, अद्यापही मानवामध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही घटना समोर न आल्यामुळं अंडी आणि चिकन खाण्यावर, विक्रीवर शासनाकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणण्यात आलेले नाहीत.
आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याच्या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात परभणी, मुंबई, दापोली अशा विविध भागांमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळत आहे.

Tags :
Bird Flu News Bird Flu In Maharashtra Bird Flu Cases In Mumbai Bird Flu In India CM Uddhav Thackeray