Bihar Assembly Elections 2025 : बिहारमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम, किंग कोण ठरणार? Special Report

Continues below advertisement
केंद्रीय निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बिहारमधील 243 जागांसाठी 6 आणि 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी 14 नोव्हेंबरला होईल. या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट लढत आहे, तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार की तेजस्वी यादव बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत, ज्यात 14 लाख नवमतदार आहेत. जवळपास 20 टक्के दलित मतदार गेम चेंजर ठरू शकतात. बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, दारूबंदी आणि जातीय राजकारण हे प्रमुख मुद्दे आहेत. NDA नितीश कुमारांच्या सुशासनावर आणि मोदींच्या विकासकामांवर भर देत आहे, तर महागठबंधन तेजस्वी यादव यांना संभाव्य चेहरा म्हणून पुढे करत आहे. प्रशांत किशोर बेरोजगारी, स्थलांतर आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहेत. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, 'डेट ऑफ पोल सहा नोव्हेंबर, थर्सडे आणि दुसरा अकरा नोव्हेंबर, ट्यूसडे काउंटिंग चौदा नोव्हेंबर को होगी'.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola