Income Tax Raid : जालन्यातील चार मोठ्या स्टील कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर
जालना येथील चार प्रमुख स्टील कंपन्यांकडून सुमारे 300 कोटी रुपयांची बेहिशेबी नोंदी असल्याचे आयकर खात्याच्या लक्षात आल्यानंतर, कंपन्यांवर छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आलीत,23 तारखेला आयकर विभागाने कंपन्यांची झडती घेतली. बांधकामासाठी सळया उत्पादक कपंन्यांनी स्टील भंगार आणि उत्पादन नोंदीमध्ये काही बनावट कंपन्यांच्या नावाने कोट्यवधीचे व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. जालना, औरंगाबाद, पुणे मुंबई कोलकत्ता येथे 32 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. चार कंपन्याची नावे न देता आयकर विभागाने केलेल्या कारवाईचा तपशील प्रेस नोट द्वारे जाहीर केलाय. छाप्यात बेहिशेबी संपत्तीशी संबंधित नोंद असलेली कागदपत्रे तसेच डिजिटल कागदपत्रे उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात आलय. 200कोटी रुपयांच्या या व्यवहारातील 12 बँकांच्या लॉकर मध्ये 2 कोटी 10 लाख रुपये तर 1.07 कोटी रुपयांचे दागिने देखील हस्तगत करण्यात आलेत .कंपनी व्यवस्थापनाने 71 कोटी रुपये अतिरिक्त नफा मिळविल्याचे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर कबुल केले आहे.