Maharashtra Politics कल्याण-डोंबिवलीत शिंदेंना शह? ठाकरेंचे माजी नगरसेवक Dipesh Mhatre भाजपमध्ये
Continues below advertisement
कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून, शिवसेनेच्या (UBT) ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. 'कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंना शह देण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे'. दिपेश म्हात्रे यांचा भाजप प्रवेश हा केवळ उद्धव ठाकरेंसाठीच (Uddhav Thackeray) नव्हे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासाठीही एक इशारा मानला जात आहे. कल्याण-डोंबिवली हा शिंदेंचा बालेकिल्ला असून, त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे येथील विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मित्रपक्षातच होत असलेली ही राजकीय खेळी भविष्यातील नव्या समीकरणांचे संकेत देत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement