बिग बी यांना Amitabh Bachchan हायकोर्टाचा मोठा दिलासा, प्रतीक्षा बंगल्याची भिंत पाडण्यास स्थगिती
Continues below advertisement
बिग बी अमिताभ बच्चन यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय. अमिताभ बच्चन यांच्या मुंबईच्या जूहू परिसरात असलेल्या प्रतीक्षा बंगल्याची संरक्षक भिंत पाडण्यास उच्च न्यायालयानं तूर्तास स्थगिती दिलेय. रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेनं प्रतीक्षा बंगल्याची संरक्षक भिंत तोडून काही जागा ताब्यात घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठवली मात्र त्या नोटीशीला अमिताभ बच्चन यांनी कोर्टात आव्हान दिलं. त्यावर सुनावणी करताना कोर्टानं न्यायालयानं बच्चन यांना नोटीसीबाबत महापालिकेकडे दोन आठवड्यात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यावर महापालिकेनं सहा आठवड्यात निर्णय घ्यावा. मात्र निर्णय घेतल्यानंतर तीन आठवडे त्यावर कोणतीही कठोर कारवाई करु नये, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत
Continues below advertisement