Bhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडले
Bhushi Dam Lonavala : नसतं साहस जीवावर बेतलं, वाहून गेलेल्या पैकी चौघांचे मृतदेह सापडले भुशी डॅम (Bhusi Dam) परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्याला (Lonavala News) गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे. दरम्यान 10 जण जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेले होते. त्यापैकी 5 जणांना पाण्याच्या प्रवाहातुन बाहेर पडण्यात यश आलं आहे. दरम्यान, बुडालेल्या 5 जणांपैकी 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एक अद्याप बेपत्ता आहेत. उर्वरित शोधकार्य आज करण्यात येणार आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातल्या धबधब्यातून हे पाच जण वाहून गेले आहेत. हे सर्वजण अन्सारी कुटुंबातले आहेत. यात लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुहास दिवसे घटनास्थळी पोहोचले आहेत.