Bhushan Gagrani BMC Commissioner : भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी निवड

Continues below advertisement

Bhushan Gagrani BMC Commissioner : भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी निवड  केंद्रीय निवडणूक आयोगानं विविध अधिकाऱ्यांच्या दिलेल्या बदल्यांच्या आदेशानंतर भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून इक्बालसिंह चहल यांना हटवल्यानंतर या पदासाठी तीन सनदी अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, आरोग्य खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची नावं होती. त्या चौघांमधून भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच अभिजीत बांगर यांच्याऐवजी सौरभ राव यांची ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी, तर राजेश नार्वेकर यांच्याऐवजी कैलास शिंदे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram