Ajit Pawar ShivSrushti: अजित पवारांच्या हस्ते शिवसृष्टीचं भूमिपूजन ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि शिवरायांच्या जीवनावरील ऐतिहासिक घटनांचे म्युनरल्सद्वारे शिवसृष्टी उभारण्यात येत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या या प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रांझ धातूचा सिंहासनाधिष्टीत मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडी व महाराजांच्या सेनापतींचे चित्रशिल्प भित्तीचित्रे, ऑडिओ व्हिडिओ हॉल, शिवकालीन शस्रारांचे प्रदर्शन, पुस्तक व साहित्य विक्री केंद्र, माहिती केंद्र आणि कार्यालय, किल्ले स्वरूपाचे प्रवेशद्वार व अनुषंगिक मांडणी,वाहनतळ,शिवसृष्टी आवारात उद्यान, टप्पे स्वरूपातील कारंजे आणि सुशोभीकरणाच्या अनुषंगिक बाबी यात असणार आहेत.
Continues below advertisement