Bhiwandi : दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीला रॉकेल टाकून पेटवलं, गंभीररित्या भाजलेल्या महिलेचा मृत्यू
Continues below advertisement
भिवंडी : दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळून तिला ठार मारल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भिवंडीतील शांतीनगर परिसरात घडली असून याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. फिरोज शेख असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. तर रुखसाना असे होरपळून मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.
Continues below advertisement