Bhiwandi Tier Blast : प्रमाणापेक्षा हवा भरल्याने टायर फुटला, एक जण जखमी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhiwandi Tier Blast : प्रमाणापेक्षा हवा भरल्याने टायर फुटला, एक जण जखमी
भिवंडी तालुक्यातील मानकोली परीसरात इंडियन ऑईल पेट्रोल पंप च्या बाजूला असलेल्या टायरच्या दुकानांमध्ये हवा भरत असताना टायर मध्ये अति जास्त प्रमाणात हवा भरल्याने टायर अचानक फुटून हवेत उडाल्याने सुरेंद्र कुमार यादव वय 45 वर्ष याच्या तोंडाला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे.
जखमी सुरेंद्र यादव हा पंचर बनवण्यासाठी मानकोली येथील समीम पंचरवाला याच्याकडे गेला व समीम अली याने पंचर बनवून टायरमध्ये हवा भरली परंतु जखमी सुरेंद्र यादव यांनी या टायरमध्ये अजून हवा भरण्यास सांगितले परंतु समीम अलीने सांगितले की या टायरमध्ये हवा पुरेशी आहे तेव्हा पंचर बनवण्यासाठी आलेले सुरेंद्र यादव यांनी स्वतः टायरमध्ये हवा भरण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे टायर मध्ये अति जास्त हवा भरली गेल्याने टायर अचानक फुटून उडाल्याने पंचर बनवण्यासाठी आलेले सुरेंद्र यादव यांच्या तोंडाला गंभीर जखमा झाले आहेत तात्काळ त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं आणि तेथून त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना तेथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या संदर्भात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे .