Bhiwandi : भिवंडीच्या पडघामध्ये भोंग्यांविना पहाटेची अजान, मनसेकडून हनुमान चालिसाचं पठणही नाही

Continues below advertisement

Raj Thackeray : पत्रकार परिषद सहा वाजता जाहीर केली होती, पण काही सूचना मला वाटतं आताच जाणं आवश्यक आहे. त्यामुळे वेळ बदलून आता पत्रकार परिषद घेतली. आज सकाळपासून महाराष्ट्राच्या विविध भागातून मला फोन येत आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरुनही अनेक ठिकाणांहून फोन येत आहेत, माहिती मिळत आहे. पोलिसांचे फोन येत आहेत, काही गोष्टी सांगत आहेत. सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, मनसैनिकांना पोलिस नोटीस पाठवत आहेत, पकडत आहेत, ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट आमच्याबाबतच का होते हा आमचा प्रश्न आहे. जे कायद्याचे पालन करत आहेत, त्यांना सजा देणार, ताब्यात घेणार आणि जे कायदा पाळत नाहीत त्यांना मोकळीक देणार? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तसेच जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत, निर्णय लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram