Bhiwandi Amazon Bus Accident : भिवंडीजवळ मिनीबसचा टायर फुटून अपघात, एकाचा मृत्यू; 9 जण गंभीर जखमी
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ आज पहाटे एका मिनीबसचा भीषण अपघात झाला.. यामध्ये बसच्या क्लीनरचा मृत्यू झाला आहे.. अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या बसचं टायर फुटलं, ज्यामुळे बस अनियंत्रित झाली, आणि दिभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या कंटेनरवर धडकली. बस मध्ये बसलेले ९ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कल्याण रोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.