Lockdown | भिवंडीत आदिवासी पाड्यातील गरजूंना कवाड ग्रामपंचायतीकडून अन्नधान्याचं वाटप

देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गावागावात संचारबंदी असल्यामुळे परिणामी सर्व कामे ठप्प पडली आहेत. मजुरीच्या भरवशावर असणारे कुटुंब अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे कवाड ग्रामपंचायती आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश गुरव यांच्या वतीने  तालुक्यातील आदिवासी पड्यावरील गरजू आणि गरीब कुटुंबातील नागरिकांवर उपासमारीची पाळी येऊ नये, यासाठी 10 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यात मास्क, सॅनिटायझर, तांदूळ, दाळ, तेल, कांदा, बटाटा, साखर, चहा पावडर, तिखट, मीठ, हळद, साबणाचा समावेश आहे. अन्नधान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्यात आलं. तसंच कोरोनापासून स्वत:चा बचाव कसा करायचा याबाबतही जनजागृती करण्यात आली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola