Bhiwandi Crime : भिवंडीत 14 फेब्रुवारीला झालेल्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा गेला जीव

Continues below advertisement

Bhiwandi Crime : भिवंडीत 14  फेब्रुवारीला झालेल्या मारहाणीत अल्पवयीन मुलाचा गेला जीव भिवंडीत १४ फेब्रुवारी रोजी एका बीएनएन कॉलेजबाहेरच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन युवकाचा उपचारांदरम्यान आज मृत्यू झाला. संकेत सुनील भोसले असं मृत्यू झालेल्या १६ वर्षांच्या युवकाचं नाव आहे. त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या मारहाण प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे भिवंडी शहर उपप्रमुख कैलास धोत्रेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास धोत्रे आणि त्याच्या गुंडांनी संकेत भोसलेचं अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. त्या मारहाणीत संकेतचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच बीएनएन कॉलेज ते वऱ्हाळदेवी रोड परिसरात संतापाची लाट उसळली. काही गाड्यांची तोडफोड करण्यात आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गाड्यांची तोडफोडीची सारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपली आहे. भिवंडी पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram