Bhima Koregaon case : Sambhaji Bhide यांच्यावर 5 वर्षात कारवाई का नाही? मूळ तक्रारदार हायकोर्टात

भीमा कोरेगाव प्रकरणी आरोपी क्रमांक 1 बनवलेल्या मनोहर उर्फ संभाजी भिडेंवर अद्याप कारवाई का नाही?, अशी सवाल करत मूळ तक्रारदार अनिता सावळे यांनी पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावलेत. मात्र त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास तांत्रिक कारणांमुळे असमर्थ असल्याचं सांगत कोर्टानं त्यांना दुस-या खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे आता पुढील आठवड्यात यावर नव्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी आरोपी क्रमांक 1 संभाजी भिडेंवर पाच वर्षांत कुठलीही कारवाई केलेली नाही. तसेच भिडेंकडून वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. दरम्यान, पुढील आठवड्यात यावर नव्या खंडपीठापुढे पुन्हा सुनवणी होण्याची शक्यता आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola