Patoda Gram Panchayat Election Result | पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात

Continues below advertisement

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. तब्बल 25 वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या कन्या अनुराधा पेरे- पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून त्यांचा पराभव झाला आहे.

महाराष्ट्रभरात गावाला ओळख देणारे विकास पुरुष भास्कर पेरे-पाटील यांचं वर्चस्व संपुष्टात आलं आहे. भास्कर पेरे-पाटील यांचा तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर वर्चस्व होतं. मात्र यावर्षी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram