Bhaskar Jadhav : 12 आमदारांच्या निलंबनाचा भाजपला राग, भास्कर जाधव यांचा विरोधकांवर आरोप

Continues below advertisement

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख झाल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार शाब्दीक चकमक झडली. एका लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं याची आठवण करून दिली. आणि त्यावरून जोरदार वाद झडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला. त्यानंतर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाला. अखेर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितल्यानंतरच या वादावर पडदा पडला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram