Bhaskar Jadhav Allegations | भास्कर जाधव यांचे गौप्यस्फोट, Shinde-Fadnavis वर गंभीर आरोप

गुहागरमधील मुंबईवासियांच्या मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी मोठे गौप्यस्फोट केले. दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रचारावेळी जातीवाचक बोलल्याचा ठपका ठेवत, आपल्या अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री Eknath Shinde आणि गृहमंत्री Fadnavis यांनी दबाव आणला होता, असा आरोप त्यांनी केला. ब्राह्मण समाजावरही त्यांनी टीका केली. ब्राह्मण समाज पाताळी यंत्री असल्याचा आरोप करत, समाजात तेढ निर्माण करणारा अनाजीपंत असे जाधव म्हणाले. कुणबी समाजाला त्यांनी "सावध व्हा, हा शेवटचा वार आहे. मी बाजूला झालो तर तुम्हाला घेऊन टाकतील" असा इशारा दिला. माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा आणि ह्यांना जेलमध्ये टाका, असे म्हणत नेत्यांचे फोन एसपींना येत होते, असे त्यांनी सांगितले. एसपींनी "ज्या दिवशी एवढा जरी पुरावा सापडला तर मी अटक करेन पण एवढाही पुरावा नाही" असे उत्तर दिल्याचे जाधव यांनी नमूद केले. छोटे-छोटे समाज एकवटतील असे वाटले होते, पण मराठ्यांनी मनावर घेतल्यास गावामध्ये मराठ्यांनाच मानणारा वर्ग आहे, असेही ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola