Bhaskar Jadhav on Karnataka : भास्करराव जाधवांकडून हाताला काळी फित लावत कर्नाटकचा निषेध
आज 1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस असून दरवर्षी सीमाभागातील मराठी बांधव हा दिवस काळा दिवस म्हणून पाळतात. या दिवशी मोर्चा आणि सायकल रॅली काढून कर्नाटक सरकारच्या जुलमी राजवटीचा निषेध करतात. परंतु,यावर्षी मोर्चा,रॅली काढण्यास मनाई करण्यात आली असली तरी सीमा भागातील मराठी बांधवांच्या अशाप्रकारे सुरू असलेल्या मुस्कटदाबीचा निषेध म्हणून भास्करराव जाधव यांनी कर्नाटक निषेधार्थ आज आपल्या हातावर काळी फित लावून कार्यालयातील कामकाज सुरु ठेवले.
Tags :
Bhaskar Jadhav