Bhaskar Jadhav Full Speech : राणेंना धुतलं...कदमांना झाडलं... चिरफाड करणारं धमाकेदार भाषण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhaskar Jadhav Full Speech : राणेंना धुतलं...कदमांना झाडलं... चिरफाड करणारं धमाकेदार भाषण मुलाच्या भाषणावेळी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव भावूक , जनतेशी संवाद मेळाव्यात मुलगा भाषण करत असताना भास्कर जाधव यांना अश्रृ अनावर. मी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सांगितलं होतं की, तुम्ही पक्षप्रमुख आहात, तुम्ही काय निर्णय घ्यायचा हे सांगणारा मी कोण? तुम्ही कुठेही जा, मात्र तुम्ही जर भाजपाबरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्याबरोबर नसेल, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) फुटल्यानंतर पहिल्या बैठकीतील किस्सा आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितला आहे. भास्कर जाधव म्हणाले की, राज्यसभेसाठी 20 तारखेला मतदान झाले होते. 21 तारखेला आमदार सुरतला गेले. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला होता. ते म्हणाले की, तुम्ही ताबडतोब कार्यालयात या. मात्र मला कार्यालयात पोहोचायला थोडा उशीर झाला. वर्षा बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली होती.