Bhaskar Jadhav and Narayan Rane : नेत्यांच्या जीभेसोबत राज्याच्या राजकारणाची पातळीही घसरतेय

Continues below advertisement

महाराष्ट्रातल्या राजकरणाचा  आणखी एक फडतूस अंक आज पाहायला मिळाला. राजकारणी एकमेकांवर टीका करताना कोणत्या पातळीला घसरतील याचा नेम नाही. याचाच प्रत्यय नारायण राणे आणि भास्कर जाधवांनी केलेल्या टीकेतून आलाय. भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंबद्दल बोलताना आणि नारायण राणे यांनी विनायक राउतांबद्दल बोलताना आक्षेपार्ह शब्दात टीका केलीये. ही टीका करताना या दोघाही ज्येष्ठ नेत्यांना राजकीय विधीनेिषेधही राहीला नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल. कारण दोघांनीही केलेल्या टीकेला वर्णभेदाची किनार आहे.  त्यामुळे नेत्यांच्या जीभेसोबत राज्याच्या राजकारणाची पातळीही घसरत चाललीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram