Bharat Jadhav On Ratnagiri Theatre : रत्नागिरीतील नाट्यगृहाच्या अवस्थेवरून भरत जाधव यांची नाराजी
अभिनेता भरत जाधव यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरीतल्या नाट्यगृहातील एसी आणि साऊंड सिस्टिंमवरून भरत जाधव नाराज झाले. नाट्यगृहाची अशी अवस्था असेल तर रत्नागिरीत पुन्हा पाय ठेवणार नाही.. असंही भरत जाधव म्हणाले आहेत .. एसी नसल्याने काय होतं हे आमच्या भुमिकेतून पहा असं म्हणत भरत जाधवांनी प्रेक्षकांना कळकळीची विनंती केली.. प्रेक्षक एवढे शांत कसे राहू शकता, रत्नागिरीत पुन्हा शो करणार नाही प्रेक्षकांची हात जोडून माफी मागत जाहीर केलंय ..