Bharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाही
Bharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाही
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. पण, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात महायुतीचंच सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच गेल्या लोकसभेला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावं लागणाऱ्या महायुतीने विदर्भात मुसंडी मारत घवघवीत यश मिळवले आहे.
असे असले तरी विदर्भातील मतदारराजा ज्या पक्षाला निवडणुकीत पाठिंबा देता, तो पक्ष राज्यात सत्तेच्या सिंहासनी विराजमान होतो, असं राजकीय गणित असल्याचा एक समज आहे. दरम्यान, विधानसभेच्या जागांच्या या प्रदेशात काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये मुख्य लढत होती. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमधील मुख्य लढती एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्ष विदर्भावर वर्चस्व राखण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे बघायला मिळाले आहे. याच अनुषंगाने महायुती आणि मविआमध्ये विदर्भाच्या जागेवरून घमासान झाल्याचेही बघायला मिळाले होते. ऐकुणात विदर्भ हा राज्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून आले आहे. दरम्यान आता तुमच्या मतदारसंघात किंवा तुमच्या गावाकडे कोण जिंकलं? कोणी गुलाल उधळला? आजपासून पुढच्या पाच वर्षांसाठी तुमचा आमदार कोण? यांची सविस्तर माहती जाणून घेऊ.